पुलवामा हल्ला :काल एक वर्ष पूर्ण

Share on facebook
Share on google
Share on twitter
Share on linkedin
drone network

▪ एक कटू आठवण! 14 फेब्रुवारी 2019, हा दिवस भारतीय कधीच विसणार नाही…

▪ जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात 14 फेब्रुवारी 2019 रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले आहेत, तर अनेक जण जखमी झाले होते.

👉🏼 जाणून घ्या घटना : दहशतवाद्याने 200 किलोहून अधिक स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ कार जवानांच्या ताफ्यावर धडकवली होती. जैश-ए-मोहम्मद या दहशतवाद्यांनी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

👉🏼 जम्मू-काश्मीर मध्ये झालेले सर्वात मोठे हल्ले…

● 14 जानेवारी, 2019 : पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला. या हल्ल्यात 44 जवान शहीद झाल्याची माहिती.

● 7 फेब्रुवारी, 2018 : जम्मू-कश्मीरच्या अखनूरमध्ये स्फोटात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद, 6 स्थानिक लोक जखमी.

● 9 जानेवारी 2017 : जम्मू-कश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये जीआरईएपच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला. या हल्ल्यात तीन नागरिकांचा मृत्यू.

● 12 फेब्रुवारी 2017 : कुलगाम जिल्ह्यातील नागबल येथे दहशतवादी हल्ल्यात 2 जवान शहीद, 2 स्थानिक नागरिकांचा मृत्यू. चार दहशतवाद्यांचा खात्मा.

● 14 फेब्रुवारी 2017 : बांदिपुरा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन जवानांचा मृत्यू, एका दहशतवाद्याचा खात्मा, कुलवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे एका जवानाचा मृत्यू, तर तीन दहशतवाद्यांचा खात्मा.

● 23 फेब्रुवारी 2017 : काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातील मुलू चित्रगाम येथे दहशतवादी हल्ल्यात 4 जवान शहीद.

● 16 जून 2017 : अनंतनाग जिल्ह्यातील अचबल येथे पोलीस दलावर दहशतवादी हल्ल्यात सहा पोलीस शहीद.

● 10 जुलै, 2017 : अमरनाथला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर जम्मू-श्रीनगर महामार्गावर दहशतवादी हल्ला. पाच महिलांसह सात भाविकांचा मृत्यू.

● 27 ऑगस्ट, 2017 : पुलवामा जिल्ह्यातील जिल्हा पोलीस लायन्समध्ये घुसून दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार. आठ पोलीस शहीद. जैश-ए-मोहम्मदने घेतली होती जबाबदारी.

● 1 सप्टेंबर, 2017 : जम्मू-कश्मीर पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला. तीन पोलीस शहीद.

● 27 सप्टेंबर, 2017 : सुट्टीसाठी घरा जाणाऱ्या BSF कॉन्स्टेबल रमीज पर्रेय याचे अपहरण करून दहशतवाद्यांनी केली हत्या.

● 31 डिसेंबर 2018 : पुलवामध्ये सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रावर आत्मघातकी हल्ला, पाच जवान शहीद

● 25 जून 2016 : पुलवामामध्ये CRPF च्या पथकावर हल्ला, आठ जवान शहीद, 28 जखमी.

● मे, 2016 : श्रीनगरमध्ये दोन ठिकाणी पोलिसांवर दहशतवादी हल्ला. तीन पोलीस शहीद.

● जानेवारी 2016 : पठानकोट एअरबेसवर दहशतवादी हल्ल्यात सात जवान शहीद, 20 जखमी

Drone Network

Drone Network

Leave a Replay

जाहिरात

सबस्काइब करा