Home ठळक बातम्या आज दिवसभरातील घडामोडी

आज दिवसभरातील घडामोडी

49
0
drone network

▪ दिल्लीत आम आदमी पक्षाच्या शपथग्रहण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही निमंत्रित; 16 फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानात होणार शपथविधी

▪ एप्रिल ते डिसेंबर 2019 या कालावधीत सार्वजनिक क्षेत्रातील 18 बँकांमध्ये मिळून 1.17 लाख कोटी रुपयांची 8,926 गैरव्यवहाराची प्रकरणे उघडकीस

▪ निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विनय शर्माची मानसिकदृष्ट्या आजारी असल्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

▪ जपानमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याने एकाचा मृत्यू; योकोहामा बंदरावर उभ्या असलेल्या डायमंड प्रिन्सेस क्रूझवरील 218 जणांनाही कोरोनाची लागण

▪ एल्गार परिषद प्रकरणी दाखल खटला, मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाकडे वर्ग करण्यास, पुणे कोर्टाची मंजुरी; पुणे कोर्टाने दिले ना हरकत पत्र

▪ ‘मी फक्त पक्षाचा झेंडा बदलला आहे. काही लोक तर भूमिका बदलून सत्तेत आले’, मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

▪ कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा आणि प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला

▪ शाओमी या स्मार्टफोन कंपनीने शाओमी Mi 10 आणि Mi 10 Pro हे दोन्ही फोन मार्केटमध्ये केले लॉन्च; स्मार्टफोनला रिवर्स वायरलेस चार्जिंग फीचर

▪ हिरो इंडियन सुपर लिगमधील सामन्यात एफसी गोवा संघाने मुंबई सिटी एफसीचा 5-2 ने केला पराभव; गोवा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी

▪ सुजय डहाके दिग्दर्शित तसेच कुस्तीवर आधारित ‘केसरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; विराट मडके प्रमुख भूमिकेत झळकणार