Home ठळक बातम्या सकाळच्या बातम्या

सकाळच्या बातम्या

8
0
drone network

▪ महागाईचा भडका; 6 वर्षांमधील उच्चांक गाठला; घाऊक बाजारात महागाई दर 7.59 टक्क्यांवर

▪ केरळ पोलिसांच्या विशेष सशस्त्र पोलीस बटालियनच्या 25 रायफली व 12 हजारांपेक्षा जास्त काडतुसे गहाळ; कॅगच्या अहवालात समोर

▪ ईव्हीएम मध्ये फेरफार करता येत नाही, पुन्हा मतपत्रिकांची पद्धत स्वीकारण्याचा प्रश्चच नाही; मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा

▪ सरकारी कर्मचाऱ्याला पाच दिवसांचा आठवडा असेल तर सात दिवसांचा पगार का द्यायचा?; मंत्री बच्चू कडू यांचा सवाल

▪ राज्यातील शाळांत दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य होणार; उद्योग आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची माहिती

▪ हिंगणघाट पीडितेच्या मारेकऱ्यास नागपूरच्या विशेष सेलमध्ये हलविण्यात आले असून जेलमध्ये त्यावर 24 तास पाळत ठेवली जाणार

▪ जीवाश्म इंधानापासून होणाऱ्या प्रदूषणामुळे जगाची रोज आठ अब्ज डॉलरची हानी; पर्यावरण विषयात काम करणाऱ्या संस्थांच्या अभ्यासातून समोर

▪ जपानच्या योकोहामाच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या ‘डायमंड प्रिन्सेस’ जहाजावरील दोघा भारतीयांना कोरोना व्हायरसची लागण

▪ भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसी वनडे रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी; विराटचे 17 गुण घटले

▪ दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘पांघरूण’ : पुन्हा एक विलक्षण प्रेमकहाणी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित