Home ठळक बातम्या महत्वाचे

महत्वाचे

7
0
drone network

1). सरकारला अडचणीत आणणारी वक्तव्य करु नका : उद्धव ठाकरे
-सार्वजनिकरित्या पक्षाला आणि सरकारला अडचणीत आणणारी वादग्रस्त वक्तव्ये टाळा, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना

2). मनसेच्या बॅनरवर पहिल्यांदाच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर

3). भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड, तर मंगल प्रभात लोढा मुंबई अध्यक्ष

4). महापालिकेच्या फेरीवाला धोरणाविरोधात मनसेचा मुंबईत मोर्चा

5). नेत्यांवरील गुन्ह्याची माहिती प्रसिद्ध करा : सर्वोच्च न्यायालय
-गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांची/उमेदवारांची माहिती इलेक्ट्रॉनिक मीडिया, स्थानिक-राष्ट्रीय वृत्तपत्र, वेबसाईट आणि फेसबुकवर द्या, सर्वोच्च न्यायालयाचा राजकीय पक्षांना आदेश

6). वसईत खदाणीच्या पाण्यात बुडालेल्या मुलींचा अद्यापही शोध नाही

7). आयुक्त तुकाराम मुंढे वेळ देत नसल्याचा काँग्रेस नगरसेवकांचा आरोप

8). खेड-शिवापूरचा टोलनाका बंद करण्यासाठी आता आर या पारची लढाई, पुणे-सातारा रोडवर खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितर्फे येत्या 16 फेब्रुवारीला सर्वपक्षीय आंदोलन करणार

9). नागपूर – सिंचन घोटाळ्याची याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली

10). दुचाकीसोबत कंपनीने 2 हेल्मेट देणे बंधनकारक, नागपूर खंडपीठाचा निर्णय, परिवहन आयुक्तांना अंमलबजावणीचे आदेश

11). मुंबईतील अंधेरी एमआयडीसी परिसरातील रोळता टेक्नॉलॉजी पार्क इमारतीत भीषण आग,अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी रवाना, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

12). नवी मुंबईतील भाजपचे पाच नगरसेवक अजित पवारांच्या भेटीला, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपला धाकधूक

13). ‘लंचटाईममध्ये 2-2 तास पाय मोकळे करायला जातात, तेच हे कर्मचारी’ : राजू शेट्टी
-राज्यात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांची संख्या कमी आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांचा कामाचा दिवस कमी केल्याने सरकारवर कामाचा बोझा वाढेल आणि कामं रेंगाळत राहतील, असं म्हणत शेट्टींनी सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

14). ‘पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय मुर्खपणाचा’; काँग्रेस नेत्यानंच सरकारला सुनावलं
-महाराष्ट्र सरकारचा पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय निव्वळ मुर्खपणाचा आहे. एका आठवड्यात दोन सुट्या देण्याला अर्थ काय?, असं म्हणत संजय निरूपम यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

15). ठाकरे-राऊत आता कुठे गेले…!
सत्तेसाठी शिवसेना लाचार; प्रसाद लाड यांची टीका