Home ठळक बातम्या रा. ही. सावे ग्रंथालयाच्या ‘ह्युमन लायब्ररी’उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

रा. ही. सावे ग्रंथालयाच्या ‘ह्युमन लायब्ररी’उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

7
0

दुसऱ्यांचे अनुभव ऐकत ऐकत आणि दुसऱ्याचे निरीक्षण करीत आपल्या जीवनशैलीमध्ये व विचारांमध्ये बदल घडविता येतो. व दुसऱ्यांचे प्रकट व प्रखर आत्मानुभव ऐकूनच आपण प्रगल्भ होऊ शकतो असे प्रतिपादन सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे कोषाध्यक्ष हितेंद्रभाई शाह यांनी केले.
रा. ही. सावे ग्रंथालयाच्या वतीने आयोजित व्यक्ती ग्रंथालय म्हणजेच ह्युमन लायब्ररी या नवीन उपक्रमाच्या पहील्याच कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रंथालयाने हा उपक्रम हितेंद्रभाई शाह यांच्या कल्पनेतुन सुरू केला आहे. या कार्यक्रमाद्वारे अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे वैयक्तिक व सामाजिक जीवनातील अनुभव व्यक्त करण्यासाठी प्रेरित केले जाते. तसेच विविध क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तीला बोलावून त्यांचे अनुभव ऐकले जातात. तसेच त्यांना प्रश्नही विचारले जातात. त्या व्यक्तीचे आयुक्षानुभव आपल्या जीवनासी मिळतेजुळते आहेत का? तसेच त्या व्यक्तीचे विचार व आपले विचार याची जुळवाजुळव होवू शकते का? आणि जर असे होत असेल तर आपल्या विचारात काही आमुलाग्र बदल केले जावू शकतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्यक्ती ग्रंथालय उपक्रमातून मिळू शकतात.
या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनीही आपले विचार मांडले. काही महनीय व्यक्तींचे विचार व त्यांचे वर्तन बघुन माझ्या विचार व वर्तनात उपयुक्त व योग्य बदल मला करता आले असे प्रतिपादन डॉ. किरण सावे यांनी केले. प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी संदेश ऐकतांना तो टीपता आला पाहीजे व त्याचे अनुसरण केले पाहीजे असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव प्रा. अशोक ठाकूर हेही उपस्थित होते. त्यांनी या नवउपक्रमाला शुभेच्छा दिल्या व हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला निश्चितच सुयोग्य दिशा देईल हा आशावाद व्यक्त केला.
या उपक्रमात 25 विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व विचार मांडले.
या कार्यक्रमाची रूपरेशा प्रास्ताविक महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. शिला गोडबोले यांनी केले. तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. दर्शना म्हात्रे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. मनीष देशमुख, प्रा. श्रेया मिश्रा व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.