Home ठळक बातम्या आज दिवसभरात

आज दिवसभरात

6
0
drone network

▪ अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाची दिल्लीत एक हाती सत्ता; भाजपची घसरगुंडी; कॉंग्रेसचा सुपडा साफ.

▪ पंतप्रधान मोदी आम्हाला ‘कोरोना’पासून वाचवा! जपानच्या क्रुझवर अडकलेल्या भारतीयांची हाक.

▪ भारतात अ‍ॅपद्वारे कॅब सेवा देणारी खाजगी कंपनी ओलाची सेवा आता ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये देखील सुरू होणार.

▪ दिल्लीच्या सुरक्षेसाठी भारत अमेरिकेकडून ‘नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम खरेदी करण्याच्या तयारीत.

▪ जगभरात अलर्ट! चीनमध्ये कोरोना व्हायरसचं थैमान; आतापर्यंत तब्बल 1 हजाराहून अधिक जणांचा मृत्यू.

▪ 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन; 6 मार्चला सादर होणार महाराष्ट्र अर्थसंकल्प.

▪ राज ठाकरे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला टोला.

▪ रेडमीचा पॉवरफुल रेडमी 8A dual स्मार्टफोन लाँच; ड्युअल रियर कॅमेऱ्यासह असलेला हा फोन खरेदी करा केवळ 6 हजार 499 रुपयांमध्ये.

▪ तिसऱ्या वनडेसह न्यूझीलंडने जिंकली वनडे मालिका, टीम इंडियाचा 3-0 ने केला क्लीन स्वीप.

▪ अभिनेत्री तेजश्री प्रधानची बॉलिवूडमध्ये ‘एन्ट्री’, ‘बबलू बॅचलर’ या सिनेमामध्ये झळकणार मुख्य भूमिकेत.