Home ठळक बातम्या गेल्या वर्षी पाकचे 138 जवान ठार

गेल्या वर्षी पाकचे 138 जवान ठार

22
0

सन 2017 मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान एकूण 860 वेळा चकमकी झाल्या,यामध्ये पाकचे 138 तर भारताचे 28 जवान मारले गेले.गेल्या वर्षी 221 घटना घडल्या होत्या.चकमकीचे वाढते प्रमाण लक्षात घेता सीमेवर तणाव सतत वाढत आहे.
भारत-पाक सीमेवर,भारतीय लष्कराने आक्रमक भूमिका स्वीकारली असून पाकच्या जवानांकडून होणाऱ्या कुरापतीना जशाच तसे उत्तर देण्याचे धोरण राबवले आहे.त्यामुळे सन 2017 सालात पाकचे जवान मोठ्या संख्येने मारले गेले.सध्या भारतीय जवानांना पाकिस्तान व पाक मधून घूसखोरी करणारे अतिरेकी अशा दोन आघाडीवर लढावे लागत आहे.गेल्या वर्षी झालेल्या एकूण 860 चकमकीमध्ये पाकचे 138 जवान मृत्युमुखी पडले तर 155 जण जखमी झाले.भारताचे 28 जवान शहीद झाले तर 70 जण जायबंदी झाले.