Home ठळक बातम्या ऐतिहासिक वसई किल्यांच्या जतन व संवर्धना साठी फार काही करताना दिसत नाही

ऐतिहासिक वसई किल्यांच्या जतन व संवर्धना साठी फार काही करताना दिसत नाही

76
0

महाराष्ट्रातील गौरवशाली गडकोट, लेण्या, मंदिरे, धार्मिक स्थळे इत्यादी सारेच प्राचीन संस्कृतीची साधने आहेत. शाळेतील प्राथमिक अभ्यासक्रम जीवनात व थेट कॉलेजमधील वाटचालीत दुर्ग, इतिहास आपणास विविध माध्यमातून साद देत राहतात. सद्या महाराष्ट्रात गडकोटांच्या सँवर्धनाचे वारे मोठ्या प्रमाणावर वाहू लागल्याचे समाधानकारक चित्र पाहण्यास मिळते. किल्ले वसई मोहीम परिवार सातत्याने श्रमदान मोहिमा, लेखमाला, पुरातत्वीय निवेदने, अभ्यास सफर इत्यादी माध्यमातून प्रयत्नशील आहे. शालेय विद्यार्थी मित्रांच्या सक्रिय सहभागातुन सातत्यपूर्ण जागृती करण्याची एक अनोखी कल्पना या निमित्ताने पुढे येत आहे. विविध वयोगटातील विद्यार्थी मित्र, स्थानिक दुर्गमित्र, दुर्गसंवर्धक संघ यांचा एक अनोखा संगम साधत दुर्ग चित्रकला मोहीम सर्वांपुढे येत आहे. उत्तर कोकणचे इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी नुकताच गडकोट संवर्धनाबाबत आव्हान करणारी ३ छोटेखानी चित्र विविध माध्यमातून प्रकाशित केली. याच कल्पनेचा आधार घेत शालेय विद्यार्थी मित्रांच्या सातत्यपूर्ण चित्रकला मोहिमा भरवण्यात येत आहेत. या चित्रकला मोहिमेचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे “ही कोणत्याही प्रकारची स्पर्धा नाही.” गडकोटांवरील निस्सीम प्रेम, जबाबदारीची जाणीव, दुर्गसंवर्धन गरज या विचारातून विद्यार्थी मित्र, दुर्गमित्र यात सहभाग नोंदवणार आहेत. किल्ले वसई मोहिमचे दुर्गमित्र श्री आतिष पाटील यांच्या मते “किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत सन २००६ व २००७ साली माहीम, वसई भागात गडकोट चित्रकला मोहीम आयोजित करण्यात आली होती, यावेळीही या चित्रकला स्पर्धेत ३०० हुन अधिक विद्यार्थी मित्र सहभागी झाले होते. या मोहिमेमुळेच माहीम कोट, जंजिरे वसई संवर्धनास बळ प्राप्त झाले.” किल्ले वसई मोहीम परिवार दुर्गमित्र श्री निनाद पाटील अर्नाळा व सौ दिपाली पावसकर वसई यांच्या नेतृत्वाखाली वसई पालघर मुंबई अर्नाळा येथील तब्बल २५ शाळांमध्ये सदर उपक्रम राबवित आहेत. यात किमान २००० विद्यार्थी मित्र सहभागी होतील. येत्या तीन महिन्यात होणारी ही अनोखी गडकोट चित्रकला जागृती दुर्गसंवर्धनास बळ प्राप्त करून देईल यात शंका नाही. समस्त दुर्गमित्र परिवार या अनोख्या उपक्रमाचे स्वागत करीत असून ठाणे मुंबई दादर पालघर मधील दुर्गमित्र या मोहिमेत सेवाभावी व जबाबदारी वृत्तीने सक्रिय सहभाग नोंदवत आहेत हे विशेष.आज रविवार दि.०५ नोव्हे.२०१७
च्या वसई किल्यातिल या उपक्रमात नागरि व्यवस्था परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल ठाकुर, मयांक शेठ सहभागी होवून श्री.दत्त राऊत यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या व या पुढे त्यांच्या या कार्यात सहभागी होण्याचा मानस व्यक्त केला.वसई किल्यातील प्रि. वेडीन्ग फोटो शूट,मद्द्यपान पार्ट्या या सारख्या अनेक बेकायदा प्रकारांवर आळा घालण्या करीता सूचना फलक लावणे तसेच येणाऱ्या पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची सोय,शौचालय ची सोय व्हावी या करीता वसई किल्ल्यातील भारत सरकारच्या पुरातत्व
उपविभागाचे आधिकारी श्री. शिंदे यांची भेट घेवुन चर्चा केली.आज वसई-विरार महापालिका वसई विजयोत्स्वा च्या कार्यक्रमांतून दरवर्षी लाखो रुपये खर्च करते परंतु ज्या नरवीर चिमाजी आप्पा च्या पदस्पर्शाने व पराक्रमाने पावन झालेल्या ऐतिहासिक वसई किल्यांच्या जतन व संवर्धना साठी फार काही करताना दिसत नाही ही खंत व्यक्त केली.तसेच पुढील काळात वसईच्या जनते ने आपल्या या ऐतिहासिक वसई किल्याच्या जतन व संवर्धाना करीता पुढे यावे व सहकार्य असे आव्हान केले.