Home क्रीडा वसई तालुका स्तरावर स्केटींगची स्पर्धा 

वसई तालुका स्तरावर स्केटींगची स्पर्धा 

70
0

वसईतील नामवंत डी. एम. स्पोर्ट्स अॅकडमीतर्फे वसई तालुका स्तरावर स्केटींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.नॉट्रेडम शाळेच्या मैदानावर भरलेल्या या स्पर्धेत २०० खेळाडूंनी सहभाग घेतला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मॅनेजर सिस्टर जयंती तसेच विशेष अतिथी आनंद जुगुल यांनी स्पर्धकांचे तसेच विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. 

अतिशय शिस्तबद्ध आयोजन, खेळाडूंचा उत्साह, प्रेक्षकांची उत्सुकता यावेळी पाहण्यास मिळाली. चार तास रंगलेली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवा संचालक डिक्सन मार्टीन तसेच त्यांच्या सहकार्यांनी प्रचंड मेहनत घेतली.