Home ठळक बातम्या पालघर जातपडताळणी कार्यालयामध्ये सावळा गोंधळ

पालघर जातपडताळणी कार्यालयामध्ये सावळा गोंधळ

67
0

पालघर जिल्ह्यातील नागरिकांना यापूर्वी जातपडताळणीसाठी नवी मुंबई येथे असलेले कोंकण भवन गाठावे लागत असे.परंतु नवीन जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर हे कार्यालय पालघर येथे निर्माण करावे,अशा मागणीने जोर पकडला .त्यानंतर 2 वर्षापूर्वी पालघर पूर्व नवली येथे कार्यालय स्थापन करण्यात आले.त्यामुळे पालघरवासिय सुखावले,परंतु त्यांचा हा आनंद फार काळ टीकला नाही.”आगीतुन फुफाट्यात”अशी त्यांची सध्या अवस्था झाली आहे.

     या कार्यालयात अधिकारी कधीही उपस्थित राहत नाहीत,व कारकुनाना कोणतेही अधिकार नाहीत.हा विभाग समाजकल्याण विभागन्तर्गत येतो,परंतु या विभागाचे त्यावर नियंत्रण नाही.त्यामुळे जातपडताळणीची कामे मार्गी लागण्यास किमान 7 ते 8 महीने प्रतीक्षा करावी लागते.ज्या महिला अधिकाऱ्यांकडे या कार्यालयाचा भार आहे,त्या सध्या रजेवर आहेत त्यामुळे अन्य एका अधिकाऱ्याकड़े जबाबदारी सोपवण्यात आली आहे,ते या कार्यालयाकडे फिरकतही नाहीत.अशा गैरप्रकारामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागतो याप्रकरणी समाजकल्याणमंत्री,पालकमंत्री,कोकण आयुक्त व जिल्हाधिकारी यानी लक्ष घालून नागारिकाना दिलासा मिळवून द्यावा,अशी मागणी करण्यात येत आहे.