Home ठळक बातम्या बनावट इ पास बनवणाऱ्या भामट्यांपासून नागरिकांनी सावध रहावे-जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे

बनावट इ पास बनवणाऱ्या भामट्यांपासून नागरिकांनी सावध रहावे-जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे

9
0

शासनाने करोना विषाणूचा (कोव्हिड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनच्या कालावधीत या जिल्हयात अडकलेल्या स्थालांतरीत कामगार, यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर नागरिकांना त्यांचे मुळ गावी जाण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन ई-पास या कार्यालयाकडून दिले जातात. ऑनलाईन ई-पास नोंदणी सुविधा Covid१९.mhpolice.in या लिंक वर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. परंतू जिल्हयामध्ये काही लोकांकडून नागरीकांना ई-पास मिळवून देण्याच्या नावाने अमिष दाखविले जात आहेत. अशाच एका प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी पालघर यांचे आदेशाने तहसिलदार वसई यांनी नालासोपारा येथील गणेश झेरॉक्स सेंटर व रामदेव झेरॉक्स सेंटर यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. त्या अनुषंगाने जनतेने बनावट इ पास बनवणाऱयांपासून सावध रहावेत असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी दिला आहे.

सदर गुन्हयाच्या अनुषंगाने पोलीस यंत्रणेमार्फत पुढील तपास चालु आहे. तसेच रत्नागिरी व कोल्हापूर जिल्हयात जाण्याकरिता बोगस पास दिल्याबाबतच्या घटना निदर्शनास आल्याने या दोन्ही प्रकरणात चौकशी करुन कारवाई करणेबाबत पोलीस अधिक्षक पालघर यांना कळविले आहे.
तरी जिल्हयातील नागरीकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, आपण ऑनलाईन ई-पास
मिळणेकामी कोणाच्याही आमिषाला बळी पडू नये. तसेच ई-पास मिळवून देण्याबाबत कोणी संपर्क केल्यास
अथवा त्याकामी कोणत्याही प्रकारची मागणी केल्यास संबंधित पोलीस स्टेशनला किंवा तहसिल कार्यालय
येथे संपर्क साधून कळविणेत यावे. अशी माहितीही जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी दिली आहे.