Home ठळक बातम्या देशात नवीन शिक्षण धोरण लागू,

देशात नवीन शिक्षण धोरण लागू,

11
0

दीपक मोहिते,

देशात नवीन शिक्षण धोरण लागू,

तब्बल ३४ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नवीन शिक्षण धोरण काल अमलात आले.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत नवीन शिक्षण धोरणाला मंजुरी देण्यात आली.यापूर्वी १९८६ साली देशात पहिले शिक्षण धोरण लागू करण्यात आले होते.नवीन धोरणानुसार १० वी १२ वीच्या बोर्डाचे महत्व कमी झाले आहे.आतापर्यंत १०+२ असे शालेय शिक्षणाचे स्वरूप होते,त्याऐवजी आता ५+३+३+४ ही शिक्षण प्रणाली अमलात येणार आहे.
या नवीन शिक्षण धोरणानुसार पहिल्या पाच वर्षात पूर्व प्राथमिकची तीन वर्षे,त्यानंतर पहिली व दुसरीचे शिक्षण देण्यात येणार आहे.दुसऱ्या टप्प्यात तिसरी ते पाचवी,तिसऱ्या टप्प्यात सहावी ते आठवीपर्यंत शिकवण्यात येणार आहे.तर चौथा टप्पा-नववी ते बारावी पर्यंतचे शिक्षण असेल.या नवीन धोरणामुळे बोर्ड परीक्षेचे महत्व कमी झाले असून आता वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्यात येणार आहेत.नव्या धोरणामध्ये एनसीईआरटीला अभ्यासक्रम ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.व्होकेशनल अभ्यासक्रमावर भर,शालेय प्रगती पुस्तक बदलणे,उच्च शिक्षणामध्ये मोठे बदल,संपूर्ण देशात उच्च शिक्षणाचे नियामक व नवा शिक्षण आयोग इ.नवीन सुधारणांचा समावेश आहे.
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले हे शिक्षण धोरण अखेर काल मार्गी लागले.मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून डॉ.कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली नवीन शिक्षण धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला होता,काल त्यास मंजुरी देण्यात आली.