Home ठळक बातम्या ⭕ भरमसाट वीज बिलात २० टक्के सूट मिळणार

⭕ भरमसाट वीज बिलात २० टक्के सूट मिळणार

15
0

▪️मुंबई: जून महिन्यात लाॅकडाऊनच्या काळातील भरमसाट वीज बिल ग्राहकांना पाठवल्यानंतर निर्माण झालेला जनतेतील असंतोष कमी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारने वीज बिलात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

▪️ ही सूट २० ते ३० टक्के असेल, अशी माहिती ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी बुधवारी दिली. वाढीव वीज बिलासंदर्भात ऊर्जा विभाग एक प्रस्ताव महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला पाठवेल. निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार आयोगाला आहे, असे राऊत म्हणाले. त्याचा फायदा ७३ लाख ग्राहकांना मिळणार आहे.