Home ठळक बातम्या कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे..

कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे..

11
0

दीपक मोहिते,

कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे..

लॉकडाऊनच्या काळात बँकांनी घर व वाहन कर्जाची,शाळांनी फि व घरमालकांनी घरभाडे वसुली करू नये,असे आदेश केंद्र,राज्य व रिझर्व्ह बँकेने जारी केले होते.पण त्यांच्या या आदेशाला या सर्वांनी केराची टोपली दाखवत सध्या सक्तीने वसुली करण्यात येत आहे.
काल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांची फि वसुली करू नये व केल्यास पालकांनी ती भरू नये,असे स्पष्ट केले आहे.शिक्षणमंत्र्याच्या हा आदेश शाळेचे संस्थाचालक मानतात कि धाब्यावर बसवतात ? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
ज्या नागरिकांनी बँकामधून गृह व वाहनकर्ज घेतली आहेत,त्यांना कर्जाचे हप्ते भरणे शक्य नाही.कारण गेले चार महिन्यापासून ते दरमहा मिळणाऱ्या वेतनापासून वंचित आहेत,तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.त्यामुळे रिझर्व्ह बँकेने याविषयी बँकांना मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत.त्यामध्ये कर्जाचे हप्ते वसूल करू नये,या महत्वाच्या विषयाचा समावेश आहे.पण बँकांनी तो मानला नाही व वसुलीचे काम सुरूच ठेवले.खाजगी वित्तीय कंपन्यांनी तर वाहनांच्या कर्जाचे हप्ते न भरणाऱ्या कर्जदारांची वाहने पण जप्त केली.
शाळांच्या व्यवस्थापनानी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांच्या पालकाना सतत एसएमएस करून फि भरण्याचा तसेच शालेय साहित्य खरेदी करा,म्हणून तगादा लावला. त्यामुळे पालकवर्ग हवालदिल झाला आहे..
केंद्र व राज्य सरकारला जर बँका,वित्तीय संस्था व शिक्षण संस्था जुमानत नसतील तर सर्वसामान्यजनांनी कोणाकडे आशेने पाहायचे ? सरकारने केवळ आदेश न देता या लोकांवर कठोर कारवाई करावी.