Home ठळक बातम्या जिल्ह्यात यंदा तीव्र पाणीटंचाई जाणवणार..

जिल्ह्यात यंदा तीव्र पाणीटंचाई जाणवणार..

14
0

दीपक मोहिते,

जिल्ह्यात यंदा तीव्र पाणीटंचाई जाणवणार..

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात पर्जन्यमानाचे प्रमाण अत्यंत कमी असून येत्या उन्हाळ्यात जिल्हावासीयांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे
लागणार आहे.दोन वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.त्यावेळी शासनाने पालघर,तलासरी व विक्रमगड या तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता.त्याची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे.गेल्या वर्षी कालच्या तारखेपर्यंत १५७७.१ मि.मी. टक्के पाऊस झाला होता,यंदा मात्र तो अद्याप १५० मि.मी.पर्यंतही पोहोचलेला नाही.त्यामुळे जिल्ह्यातील धरणे,तलाव व विहिरीतील पाण्याची पातळी जाने.महिन्याच्या अखेरीस खालावण्याची शक्यता आहे.
गेल्या १५ वर्षांपासून जिल्ह्यातील पर्जन्यमानाचे प्रमाण दिवसेंदिवस उतरणीला लागले आहे.त्याचा परिणाम जिल्ह्यातील शेती व बागायतीवर जाणवू लागला आहे.जिल्ह्यातील भातशेती व बागायती,ही पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे.स्वातंत्र्योत्तर काळात जिल्ह्यात जलसिंचनासाठी अन्य पर्याय निर्माण करण्यात राज्याच्या जलसंपदा विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्याना दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाला सामोरे जावे लागते.एकीकडे कॊरोना तर दुसरीकडे निसर्गाची अवकृपा,अशा दुष्टचक्रात अडकलेला बळीराजा आज भितीच्या सावटाखाली आला आहे.
पावसाचे प्रमाण सतत उतरणीला लागले तर जिल्ह्यातील भातशेतीचे क्षेत्रही घटत जाईल.स्थानिक भूमीपुत्रांची मुले,आता शेती,बागायती या वाडवडीलापासून चालत आलेल्या पारंपारिक व्यवसायापासून फारकत घेऊ लागले आहेत.नवी पिढी आता रेतीउत्खनन,वीटभट्टी,
बांधकाम व रिक्षाव्यवसाय यामध्ये आपले नशीब अजमावू लागले आहेत. नवीन पिढी,पावसाचा लपंडाव,बोगस बी-बियाणे,खते यामुळे अडचणीत असलेला शेती व्यवसाय “नको रे बाप्पा” असे म्हणू लागले आहेत.