Home ठळक बातम्या कोरोनाच्या काळात सत्तेचा खेळ थांबवा…

कोरोनाच्या काळात सत्तेचा खेळ थांबवा…

11
0

दीपक मोहिते,

कोरोनाच्या काळात सत्तेचा खेळ थांबवा…

महाराष्ट्राची जनता कोरोनामुळे हैराण झाली असताना राज्यकर्ते मात्र हमरी तुमरीचा हूतुतु खेळण्यात धन्यता मानत आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये “आमचे सरकार पाडून दाखवाच” असे जाहीर वक्तव्य केले.त्यामुळे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील यांची चांगलीच आगपाखड झाली आहे.त्यांनी ठाकरे यांच्या आव्हानाला काउंटर करताना “हे सरकार पाडण्यात आम्हाला स्वारस्य नाही,पण ते चालवून तर दाखवा”,असा पलटवार केला आहे.उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करून एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.त्यांच्या या वक्तव्यातून दोन अर्थ ध्वनित होतात,एक भाजपची मंडळी,माझे सरकार पाडण्यासाठी कट-कारस्थाने करत आहेत,असा संदेश लोकांमध्ये जातो आणि जर माझे सरकार यांच्या कट कारस्थानामुळे पडलेच तर लोकांची सहानुभूती त्यांना मिळेल.त्यामुळे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील हे दोघे चांगलेच बावचळले आहेत.महाविकास आघाडी म्हणजे तीनचाकी रिक्षा,गाडीचे स्टीअरिंग अजितदादाच्या हाती,पुण्यात अजितदादांची बदनामी करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा डाव,अशा प्रकारची वक्तव्ये जेव्हा या दोघांकडून केली जातात,यावरून सत्ता गेल्यानंतर या दोघांना किती नैराश्य आले आहे,ते दिसून येते.आज राज्यात काय स्थिती आहे,ही वेळ घाणेरडे राजकारणाची नसून एकमेकांच्या हातात हात घालून कोरोनाचा मुकाबला करण्याची आहे.पण तसे न होता “सत्तेसाठी काय पन” असा “तीन पैश्याचा तमाशा” आयोजित करण्यामध्ये ही मंडळी धन्यता मानत आहेत.