Home ठळक बातम्या आ.क्षितिज ठाकूर ; विकासाचे व्हिजन असलेला युवा आमदार

आ.क्षितिज ठाकूर ; विकासाचे व्हिजन असलेला युवा आमदार

19
0

दीपक मोहिते,

आ.क्षितिज ठाकूर ; विकासाचे व्हिजन असलेला युवा आमदार

आज नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे युवा आ.क्षितिज ठाकूर यांचा जन्मदिवस.दरवर्षी हा दिवस आनंदाचा सोहळा असतो.त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विवा महाविद्यालयाच्या त्यांच्या कार्यालयाच्या आवारात हितचिंतक व पक्षाच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळत असते.यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आ.क्षितिज ठाकूर यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे प्रसंग आनंदाचा असला तरी तो साधेपणाने साजरा होणार आहे.
उच्चविद्याविभूषित आ.ठाकूर हे सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले.प्रत्येक खेपेस त्यांच्या मताधिक्यात वाढ होत गेली.गेल्या १५ वर्षात त्यांनी अथक प्रयत्नाने तालुक्यातील असंख्य विकासकामे मार्गी लावली.सुर्या पाणीपुरवठा प्रकल्पाअंतर्गत अतिरिक्त पाणी पुरवठा योजना त्यांनी यशस्वीपणे मार्गी लावली.त्यामुळे पाणीटंचाईच्या प्रश्नावरून कुरघोडी करणाऱ्या विरोधकांची तोंडे कायमची बंद झाली.गेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी दूषित वातावरण निर्माण केले होते.पण आ.क्षितिज ठाकूर यांनी संयम,सहनशीलता व समंजसपणा,यांच्या बळावर प्रचंड मताधिक्य घेत,विरोधी पक्षाच्या उमेदवाराला धूळ चारली.मतदार हे विकासकामांना प्राधान्य देणाऱ्या उमेदवाराला डोक्यावर घेतात,असा आजवरचा अनुभव आहे.आ.ठाकूर याना तर नालासोपारा मतदारसंघातील मतदारांनी गेल्या तीन निवडणुकीत डोक्यावर घेतले.
सध्या कोरोनाचा कहर वाढत असून त्यावर नियंत्रण यावे,यासाठी आ.क्षितिज ठाकूर व त्यांची टीम,दिवसरात्र मेहनत करत आहेत.आपल्या वडिलांनी वसईकर जनतेला दिलेला शब्द खरा करून दाखवण्याचे धनुष्य त्यांनी यशस्वीरित्या पेलले आहे. गेल्या साडेतीन महिन्याच्या काळात ६४ लाख लोकाना दोन वेळचे मोफत जेवण,अन्नधान्य, वैद्यकीय साहित्य वाटप केले.तसेच क्वाराटाईनसाठी आपल्या मालकीचे शिरगाव येथील विवा महाविद्यालय शासनाला देऊ केले.आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे हितचिंतक व पक्षाचे कार्यकर्ते विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत.विकासाचे स्वप्न उराशी बाळगून गेली दीड दशके कार्यरत असलेल्या या युवा आमदाराला मनःपूर्वक शुभेच्छा…