Home ठळक बातम्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फॉर्स ची स्थापना

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फॉर्स ची स्थापना

24
0

कोविड-१९ चा मृत्यु दर १ टक्या पेक्षा कमी करण्यासाठी टास्क फ़ोर्स काम करणार

जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे

पालघर दि 8 : कोव्हीड 19 चा रुग्ण हा गंभीर अवस्थेत असेल तर त्वरित उपलब्ध भीषक हे मुंबई येथील तज्ञांना संपर्क करून मार्गदर्शन घेऊन पुढील उपचार पद्धती ठरवून संबंधित रुग्ण दगावणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. या सर्व बाबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी टास्क फ़ोर्स ची स्थापन करण्यात आली असून कोविड-१९ चा मृत्यु दर १ % पेक्षा कमी करण्यासाठी टास्क फ़ोर्स काम करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले
. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फ़ोर्सची स्थापना करण्यात आली त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ शिंदे बोलत होते.
या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कांचन वानेरे, वेदांता मेडिकल कॉलेजचे .अधिष्ठाता डॉ. वाडेकर
भारतीय वैद्यकिय संघटनाचे जिल्हा अध्यक्ष डॉ चव्हाण तसेच आदी सदस्य उपस्थित होते.
दररोज संध्याकाळी उपचार देणाऱ्या डॉक्टरांची बैठक घेऊन रुग्णांच्या स्थितीविषयी चर्चा करण्यात येणार असून अत्यवस्थ परिस्थिती मध्ये असणाऱ्या जास्त वयाच्या रुग्णांवर उपचार पद्धती कुठल्या पद्धतीने चालू आहे,त्याबाबतीतले सर्व नियम पाळले जात आहेत की नाही , याबाबत टास्क फोर्स च्या माध्यमातून आठवड्यातुन दोनदा आढावा घेण्यात येणार आहे.असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व कोव्हिड रुग्णालयांमध्ये भीषक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ज्या संस्थांमध्ये भीषक नसतील तेथे खाजगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात येतील रुग्णांना द्यायच्या उपचारांची नियमावली ही पोस्टर स्वरूपात सर्व वॉर्डमध्ये लावण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी उपचार पद्धतीचे नियम पळून नर्स, कर्मचारी यांना कोव्हीड रुग्णावर उपचार करताना उपचार पद्धतीच्या नियमा बाबत मार्गदर्शन करावे. असेही जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
जिल्हा शल्य चिकित्सक, तथा टास्क फ़ोर्सच्या सदस्य सचिव डॉ. कांचन वानेरे यांनी यावेळी सर्व सदस्यांचे आभार मानले.