Home ठळक बातम्या शिवसेनेच्या वतीने वाड्यातील कोरोना योध्यांंचा सन्मान

शिवसेनेच्या वतीने वाड्यातील कोरोना योध्यांंचा सन्मान

22
0

वाडा,दि.९ जुलै
कोरोना संसर्गाच्या र्श्वभूमीवर मागील अनेक दिवसांपासून दिवस रात्र रुग्ण सेवा देणाऱ्या वाडा तालुक्यातील कुडूस, परळी व सोनाळे येथील आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका व सफाई कर्मचारी या कोविड योध्यांचा बुधवारी शिवसेनेच्यावतीने सन्मान करण्यात आला . यावेळी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, माजी आमदार पांडुरंग बरोरा,  शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुनिल पाटील, वाडा पंचायत समिती सभापती योगेश गवा,  तालुका प्रमुख उमेश पटारे,  जिल्हा परिषद सदस्य राजेश मुकणे, पं . स . सदस्य अमोल पाटील, राजेश सातवी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.