Home ठळक बातम्या तीन महिन्याची वीजबिले माफ करा…आ.क्षितिज ठाकूर

तीन महिन्याची वीजबिले माफ करा…आ.क्षितिज ठाकूर

15
0

दीपक मोहिते,

तीन महिन्याची वीजबिले माफ करा…आ.क्षितिज ठाकूर

लोकांच्या हाताला काम नाही,हाती पैसा नाही,एक वेळच्या जेवणाची मारामार असताना महावितरणने ग्राहकांना भरमसाठ रकमेची देयके पाठवली आहेत.त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.तसेच शाळा,महाविद्यालये, कारखाने,विविध आस्थापने व दुकाने,लॉकडाऊनच्या काळात बंद असताना,अशा प्रकारची अवास्तव बिले येतात कशी ? अशी विचारणा करणारे पत्र नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे युवा आ.क्षितिज ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात आ.ठाकूर यांनी लॉकडाऊन काळातील मार्च,एप्रिल व मे या तीन महिन्याची बिले सरकारने माफ करुन त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा द्यावा.सद्य परिस्थितीत उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना शाळेची फी व महावितरणने पाठवलेली भरमसाठ वीजबिले,नागरिक भरू शकत नाहीत.त्यामुळे सरकारने तीन महिन्यांची वीजबिले माफ करावी,अशी मागणी त्यांनी आपल्या पत्रात केली आहे