Home ठळक बातम्या प्रशासकीय कारभार ; नागरिकांच्या जीवावर उठता कामा नये…

प्रशासकीय कारभार ; नागरिकांच्या जीवावर उठता कामा नये…

11
0

दीपक मोहिते,

प्रशासकीय कारभार ; नागरिकांच्या जीवावर उठता कामा नये…

आजपासून वसई विरार महानगरात प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे.यापुढे आयुक्त आता प्रशासकाच्या भूमिकेत असतील.हा प्रशासकीय कालखंड हा नागरिकांना लाभदायक ठरतो की
त्रासदायक,हे अल्पावधीत आपल्याला कळणार आहे.आजवर कोणतीही प्रशासकीय राजवट लाभदायक ठरली नाही,असा इतिहास आहे.या काळात प्रशासकाला मिळणारे अमर्याद अधिकार,हे या पदावरील व्यक्तीला बेधुंद करतात.त्यामुळे प्रशासकीय राजवट म्हंटली कि सरकारी खजिन्याची लूट व मनमानी कारभार,ओघाने येतोच येतो.आजवर अनेक गृहनिर्माण संस्था तसेच ग्रामपंचायतींना याची झळ बसली आहे.
कालपर्यंत महानगरपालिकेत लोकनियुक्त प्रतिनिधींच्या समितीचा कारभार होता.आज तो संपुष्टात आला आहे.गेल्या तीन महिन्यांच्या कार्यकालात आपण सर्वांनी जी दाहकता अनुभवली.लोकप्रतिनिधींना न जुमानणे,हाताखालच्या अधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक देणे,कोणालाही विश्वासात न घेता मनमानीपणे कारभार चालवणे,अशा प्रकारे वागणाऱ्याच्या हाती आता प्रशासक म्हणून सूत्रे सोपवणे,ही एक प्रकारची धोक्याची घंटा आहे.गेल्या तीन महिन्यात चुकीच्या पद्धतीने नियोजन करण्यात आल्यामुळे आज कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढला तसेच शंभरपेक्षा अधिक नागरिकांचे बळी गेले आहेत.अशा बिकट परिस्थितीत सरकारला,वसई विरार परिसरातील कोरोना प्रादुर्भाव कमी करायचा आहे की त्यामध्ये वाढ करायचा आहे.? असा प्रश्न मनात उभा राहतो.या पदावरील व्यक्तींना मिळणारे अमर्याद अधिकार विनाशाला आमंत्रण देणारे ठरते,असा आजवरचा अनुभव आहे.त्यामुळे सरकारने नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने येथील प्रशासकीय कारभारावर बारकाईने लक्ष ठेवावे.अशी तमाम वसईकर नागरिकांची विनंती आहे.