Home ठळक बातम्या जे सांगितले ते करून दाखवले,

जे सांगितले ते करून दाखवले,

13
0

दीपक मोहिते,

जे सांगितले ते करून दाखवले,

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या महिन्याच्या प्रारंभी राज्यात “मिशन अंगेन बिगेन”ची घोषणा करत लॉकडाऊनमध्ये विविध सवलती दिल्या.त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकला.दुसरीकडे वसईचे आ.लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जेव्हा कोरोनाने तालुक्यात प्रवेश केला.त्याचवेळी आपले मिशन सुरू केले,या मिशनचे घोषवाक्य होते,”तालुक्यात एकही नागरिक उपाशी झोपणार नाही.” कुठेही गाजावाजा,बडेजावपणा नाही,मी करून दाखवेन,अशी दर्पोक्ती नाही.”जो वादा किया वोह करके दिखाया” गेल्या तीन महिन्यात ५२ लाख लोकांना दोन वेळचे पोटभर जेवण देणे,क्वाराटाईन व डॉक्टर्स/परिचारिकांच्या निवासासाठी स्वतःच्या मालकीचे महाविद्यालय उपलब्ध करणे,इ.महत्वाची कामे,त्यांनी व त्यांच्या टीमने अतिशय प्रभावीपणे पार पडली.त्यासाठी”मिशन बिगीन अगेन” “किंवा मन की बात,” असा उपक्रम त्यांनी हाती घेतला नाही.फक्त ठरवलं आणि करून दाखवले.गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात जेव्हा पुराने थैमान घातले तेव्हा हजारो पीडित ग्रामस्थांच्या घराघरात जीवनावश्यक वस्तू पोहोचवणारे आ.हितेंद्र ठाकूर हे खऱ्या अर्थाने लोकनेते ठरले आहेत.आजही सांगली जिल्ह्यातील घराघरात आ.ठाकूर यांचे नाव निघते,हीच गेल्या ३० वर्षाच्या राजकीय वाटचालीतील त्यांची खरी कमाई आहे.