Home ठळक बातम्या आदिवासी महीलेच्या आत्महत्येचे राजकारण करु नये,-आ.सुनिल भुसारा

आदिवासी महीलेच्या आत्महत्येचे राजकारण करु नये,-आ.सुनिल भुसारा

11
0

२३जून ऱोजी जव्हार तालुक्यातील देहरे ग्रामपंचायत पैकी कडव्याची माळ याठीकाणी मंगला दिलीप वाघ या महीलेने आपल्या ३ वर्षीय मुलीला फाशी देवून स्वतःही फाशी घेवून आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली यावेळी या घटनास्थळाची आमदार सुनिल भुसारा जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी तेथील उपसरपंच संदिप माळी आणि ग्रामस्थासोबत पाहणी केली यावेळी मयत मंगलाचे पती दिलीप यांच्याशी चर्चा केली असता घरात रेशनचे धान्य मोठ्याप्रमाणावर आहे.तेथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार खायला अन्न नाही,म्हणून कुणी आत्महत्या करेल,अशी परीस्थिती आमच्या गावात अजिबात नाही.उलट पैसे नसले तरी येथील रेशन दुकानदार उधारीत धान्य देत असल्याचे येथील एक दोन नाही,तर संपूर्ण गाव सांगत होते.एवढेच काय तर मयत मंगलाच्या पतीनेही गरीबी किंबा भुकबळी हे कारण नसल्याचे सांगितले.
सदरच्या घटनेने मन हेलावुन गेले आहे.अशा घटना घडुच नये,असे मनोमन वाटते यासाठी प्रयत्न करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सरकारची चुक नाही आणि सर्वच आलबेल आहे,अस सांगण्याचा आमचा प्रयत्न अजिबात नाही.मात्र घटनास्थळाची पाहणी न करता आदिवासी महीलेच्या मृत्यूचे राजकारण कोणीही करू नये.याशिवाय या आत्महत्येला भुकबळीचे स्वरूप कोणीही देवू नये,असे आवाहन यावेळी भुसारा यांनी केले.आ.भुसारा यांनी पुढे सांगितले की,या महीलेच्या घरात रेशनचे धान्य मोठ्याप्रमाणावर आहे येथील देहरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच नानु गवळी यांनीही सांगितले कि पोलिसांत फिर्याद देताना गरीबीला कंटाळून वगैरे असा कोणताही उल्लेख दिलीप वाघ यांच्याकडून झालेला नसताना फिर्यादीत असा उल्लेख आलाच कसा ? हा खरा प्रश्न आहे.या आत्महत्ये मागची अन्य काही कारणे असल्यास ती शोधून त्या दृष्टीने तपास करावा.आजवर अनेकांनी आदिवासींच्या नावावर केवळ राजकारण केले आहे,ते थांबायला हवे. यामुळे या आत्महत्येचे राजकारण करून स्वतःच्या तुंबड्या भरू नये,असे जिल्हा परीषद उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी यावेळी सांगितले.
*तर बांधकाम सभापती काशीनाथ चौधरी यांनी या घटनेकडे माणूस म्हणून बघणे गरजेचे आहे.कारण येथील शेजारी आणि ग्रामस्थांची बोलल्यानंतर अनेक पैलू समोर येत आहे,मात्र हा भुकबळीच असल्याचे सांगणे गैर असून स्वतः केलेली वक्तव्ये खरी ठरावी,असा काही विरोधकांचा प्रयत्न असून आता मयतांच्या टाळुवरचे लोणी खाणाऱ्याची दुकाने बंद करायला हवीत सांगितले.

महत्वाचे …
या घटनेनंतर घटनास्थळी भेट देवून या कुटुंबाला तात्काळ काही वस्तु तर रोख रक्कमही मदत म्हणून दिली.तर मयत मंगलाची ७ वर्षीय मुलगी असून तिच्या शिक्षणाची जबाबदारी यावेळी भुसारा यांनी घेतली तर सरकार तुमच्या पाठीशी आहे,अस वचन यावेळी सांबरे यांनी दिले आहे.