Home ठळक बातम्या बोईसर व खैरापाडा,या प्रतिबंधित क्षेत्रामधील प्रतिबंध टीसह शिथिल

बोईसर व खैरापाडा,या प्रतिबंधित क्षेत्रामधील प्रतिबंध टीसह शिथिल

16
0

पालघर दि. २६ :
प्रतिबंधित क्षेत्र क्र.PALG०८८ मौजे बोईसर, ता. पालघर येथील ग्रामपंचायत बोईसर व अंतर्गत सर्व गावे पाडे येथील रहिवास क्षेत्र व प्रतिबंधित क्षेत्र क्र.PALG०८९ मौजे खैरापाडा, ता. पालघर ग्रामपंचायत खैरापाडा व अंतर्गत सर्व गावे पाडे येथील रहिवास क्षेत्र हे ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) जाहीर करण्यात आलेले आहे.

सदर प्रतिबंधित क्षेत्रातील लोकसंख्या जास्त असल्याने तेथील रहिवासी असलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याकरिता मोठया प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत.

तसेच दि बोईसर मर्चन्ट असोसिएशननी प्रतिबंधित क्षेत्रात दिलेल्या अटी व शर्तीचे अधिन राहून व्यापार करण्याकरिता परवानगी मागितली असून
या प्रतिबंधित क्षेत्रात अटी व शर्तीन्वये प्रतिबंध शिथील करण्यात आला आहे.असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
वरील प्रमाणे मुळ प्रतिबंधित क्षेत्रातील प्रतिबंध शिथिल करतांना खालील अटी व शर्ती च्या अधिन राहून कार्यवाही बाबत संबंधिताना निर्देश देण्यात आले आहे.

सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत बैंका/ दुकाने सुरु राहतील
, बैंकेमध्ये दुकानामध्ये मास्क लावणे सक्तीचे करण्यात यावे. तसेच बँकेत/दुकानात येणाऱ्या व्यक्तींना
, सुध्दा मास्क लावणे सक्तीचे राहील.

, बँकेच्या दुकानाच्या बाहेर सॅनिटाझर व हात धुण्यासाठी पाणी साबण ठेवणे आवश्यक आहे .

, सामाजिक अंतर (Social Distancing) चा वापर बंधनकारक आहे .

, बँकेतील अधिकारी-कर्मचारी/ दुकानातील काम करणान्या व्यक्तीस ताप, सर्दी, खोकला असल्यास त्यांना कामावर बोलविण्या येऊ नये. तसेच त्याची डॉक्टरांच्या सल्याने योग्य ती तपासणी करण्यात यावी.
, कपडयाच्या दुकानातील ट्रायल रुम पूर्णत: बंद राहील, हॉटेल व्यवसायिकांची फक्त पार्सल सेवाच सुरु राहील, मासळी बाजार व उघडयावरील बाजार पूर्णतः बंद राहील याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीची असणार आहे
, प्रतिबंधित क्षेत्रातील राहत असलेले घरातील व्यक्ती अत्यावश्यक बाबी साडून कुठल्याही परिस्थितीत घराबाहेर पडणार नाही याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी .
, बँकेच्या/ दुकानाच्या बाहेरील ठिकाणी सोडिअम हायपोक्लोराईट द्रावणाने दिवसातून जास्तीत जास्त वेळा निर्जतुकीकरण करणे आवश्यक .
, बँकेने कॅशिअरचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घ्यावी.असेहि जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.