Home ठळक बातम्या वसई-विरार शहराला कोरोनाचा घट्ट विळखा..

वसई-विरार शहराला कोरोनाचा घट्ट विळखा..

24
0

दीपक मोहिते,

वसई-विरार शहराला कोरोनाचा घट्ट विळखा..

वसई-विरार मनपा क्षेत्राला कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून मनपा प्रशासनाचा हलगर्जीपणा त्यास जबाबदार आहे.मुंबई शहरात धारावी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना वसई-विरार भागात आज ३७७ नवे रुग्ण आढळून आले.रुग्णाची संख्या दररोज दुपट्टीने वाढत असून मनपा प्रशासन उपाययोजना करण्याच्या कामी अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत आहे.आज आणखी एका उपायुक्ताने आपली बदली करून घेतली आहे.मनपा प्रशासनात नेमके काय चालले आहे ? हेच करदात्यांना कळेनासे झाले आहे.कोरोना नियंत्रणात आणण्याकामी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त यशस्वी होऊ शकतात,मग वसई-विरार शहर मनपाचे आयुक्त अपयशी का ठरतात ? असा प्रश्न शहरातील करदाते विचारत आहेत.राज्यशासनाने याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
आज वसई-विरार शहर मनपा क्षेत्रातील बाधित रुग्णाच्या संख्येने तीन हजाराचा टप्पा ओलांडला असून येणाऱ्या काळात त्यामध्ये अधिक वाढ होईल,अशी भिती नागरीक व्यक्त करत आहेत.