Home ठळक बातम्या केवळ जगण्यासाठी……

केवळ जगण्यासाठी……

49
0

दीपक मोहिते,

केवळ जगण्यासाठी……

इतर राज्यातील मजूर आता जीवाच्या आकांताने आपापली गावे गाठू लागली आहेत.जीवापेक्षा या जगात दुसरं काही मोठे नाही.तो पैसा नको,ती चाकरी नको…बस्स आता जगण्यासाठी केवळ धडपड….या एकमेव उद्देशाने लोकांनी पुन्हा गावाचा रस्ता धरला आहे…
आपल्या लेकराबाळांचे कसं होईल ? या एकाच चिंतेने ग्रासलेले,हे परप्रांतीय आता मिळेल त्या मार्गाने गाव गाठण्याच्या प्रयत्नात आहेत.या ज्वलंत प्रश्नी राज्याराज्यात समन्वय नसल्यामुळे गावी परतणाऱ्या या मजुरांच्या हालअपेष्टात अधिकाधिक भर पडत आहे.तसेच प्रत्येक राज्यातील प्रशासन व सरकार,या दोघांमध्येही समन्वयाचा अभाव असल्यामुळे सरकारचे उत्तरदायित्व सध्या गटांगळ्या खात आहे.हे परप्रांतीय मजूर,आता आपला जीव धोक्यात टाकून प्रवास करू लागले आहेत.कोरोनाचा समूळ नायनाट होण्यासाठी किती कालावधी लागेल ? हे कोणीच सांगू शकत नाही,म्हणून “आपला गाव बरा” अशा निष्कर्षाप्रत हे मजूर आले व गावाच्या दिशेने मानवी ओघ सुरू झाला.गावी गेल्यानंतर पुढे काय ? याची तमा न बाळगता गावी परतणाऱ्या,या मजुरांमुळे कालांतराने ही गावे देखील कोरोनाच्या लपेट्यात येण्याची शक्यता आहे.