Home ठळक बातम्या दंगलीला पोलीस यंत्रणाही जबाबदार-आठवले

दंगलीला पोलीस यंत्रणाही जबाबदार-आठवले

26
0

भीमा-कोरेगाव दंगलीचे पडसाद अद्याप उमटत आहेत.केंद्रीयमंत्री रामदास आठवले यानी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही दंगल पूर्वनियोजित असल्याचे सांगितले.
यावेळी पत्रकाराना अधिक माहिती देताना ते म्हणाले,या दंगलीमध्ये 9 कोटी रु.चे नुकसान झाले.सणसवाडीमधील ग्रामस्थ सध्या भितीच्या वातावरणात असून त्याना आधार देण्याची गरज आहे.अट्रोसिटी कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे,परंतु हा कायदा रद्द होणार नाही.या दंगलीला पोलीस यंत्रणाही तेव्हढ़ीच जबाबदार आहे,जिग्नेश मेवाणी यानीही प्रक्षोभक भाषणे करण्याचे टाळावे,असे प्रसिद्धी माध्यमाना सांगितले.