Home ठळक बातम्या उतराई होणे आवश्यक….

उतराई होणे आवश्यक….

19
0

दीपक मोहिते,

कोरानाचा फैलाव होऊ नये,यासाठी सध्या जे सफाई कामगार,डॉक्टर्स,नर्सेस,वैद्यकीय अधिकारी व पोलीस काम करत आहेत,अशाचे कौतुक करावे,तेवढे थोडेच आहे….
विशेष करून सफाई कामगार,डॉक्टर्स व नर्सेस,ही मंडळी आपला जीव धोक्यात घालून जी सेवा देत आहेत,त्यांना सलाम….
समाजातील उपेक्षित
घटक,म्हणून ज्या सफाई कामगारांकडे पाहण्यात येते,आज तेच आमच्यासाठी देवदूत ठरले आहेत.सफाई कामाच्या ठेकेदारांकडून होणारी पिळवणूक,तुटपुंजे वेतन व असुरक्षित नोकरी,अशा दुष्टचक्रात अडकलेल्या या घटकांचा आता केंद्र व राज्य सरकारांनी वेगळा विचार करणे अगत्याचे आहे.या कामगारांसाठी केंद्र सरकारने आजवर अनेक आयोग नेमले,पण या कामगारांचे भले काही होऊ शकले नाही.निदान आता तरी या देवदूतांचे राहणीमान सुधारावे,यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत,तरच त्यांनी या बिकटप्रसंगी केलेल्या कामाची उतराई केल्यासारखे होईल.
रुग्णालयात एखादा रुग्ण दगावला कि डॉक्टर्स व नर्सेसवर जे हल्ले होत असतात,ते थांबले पाहिजेत.आज या दोघांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जे धैर्य दाखवले, आपली घरेदारे सोडून दिवसरात्र सेवा दिली,त्यास तोड नाही.इतर वेळी दुर्लक्षित राहणाऱ्या वर्गाची खरी किंमत आपल्याला या काळात कळली,हेही नसे थोडके…
यापुढे आपली जबाबदारी आहे कि त्यांनी केलेल्या या कामगिरीची दखल घेऊन त्याची उतराई होणे.सध्या सुरू असलेली ही लढाई आणखी काही काळ चालणार आहे,व ही मंडळी आपल्या परीने ही लढाई लढतीलही,पण लढाईचे सूप वाजल्यानंतर मात्र “तू कोण आणि मी कोण” असे होता कामा नये..